पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात
लेखक : गंगाधर ढोबळे / सुषमा ढोबळे
प्रकाशन : संधिकाल
मूल्य : ₹ २००/-
नदी म्हटलं की, मला तिच्या बऱ्याच गोष्टी भावतात त्यात तिचा प्रवास, तिच्या काठावरून गेलेल्या व्यापारी वाटा आणि त्यांना अनुसरून त्यांच्या किनारी नांदलेल्या संस्कृती ! ह्या सर्वांचा अभ्यास करताना मला अनेक प्रश्न पडतात मग ते सोडवण्यासाठी कित्येक पुस्तकं शोधत फिरतो. त्यातच हे पुस्तक मला बदलापूरमध्ये एका पुस्तक प्रदर्शनात दिसले आणि लागलीच त्यावर झडप टाकली. lockdown सारखा golden period हाताला लागला आणि ह्या खजिन्यावर येथेच्छ ताव मारायला सुरुवात केली. बरं असो !
हे पुस्तक नावाप्रमाणे आहे असे वाटत होते पण चकवा बसला. खरं तर ब्रम्हपुत्रा म्हटले तर हि नदी नाही तर "नद" आहे आणि त्याच्या विषयी मला बरंच काही जाणून घ्यायचे होते त्यात पुस्तकाचे नाव पाहिले म्ह्णून थोडा interest वाटला आणि म्ह्णून म्हटले कि, चकवा लागला कारण हे एक प्रवासवर्णन आहे पण अगदीच रटाळ नाही तर ह्यात चवीला अगदी महाभारतकालीन इतिहास टाकला आहे त्यामुळे एक रुचकर विषय आपल्या समोर येतो आणि ईशान्य भारतातील अनेक गोष्टी, संस्कृती, तेथील ठिकाणांना पडलेली नावं आपल्याला समजतात. लेखक आणि त्यांच्या पत्नी स्वतःची कार घेऊन मुंबई ते ईशान्य भारतातील सात राज्यांचा प्रवास करत असताना त्यांना आलेले अनुभव म्हणजे हे पुस्तक ! हा प्रवास अत्यंत थ्रिल असा आहे, त्यांचा तो अनुभव नाकारता येणार नाही.
साधारणतः माझ्या कॉलेज life मध्ये लोकमत वर्तमानपत्राबरोबर ऑक्सिजन नावाची पुरवणी यायची तेव्हा त्यात एकदा ईशान्य भारत special म्हणून संपूर्ण पुरवणी त्या प्रदेशाला वाहिली होती तेव्हा त्यात तेथील बऱ्याच तरुण मंडळींनी लेख लिहिले होते. ते मुंबईला भारत समजतात कारण आपण त्यांना चिनी समजतो, का ? तर त्यांची चेहरेपट्टी ! तेव्हा पासून त्यांच्या विषयी माझ्या मनात आस्था निर्माण झाली आणि ह्या पुस्तकाने माझे बरेच प्रश्न सोडवले बरं तर मग एकंदरीत ह्या प्रवासवर्णनात नवनवीन गोष्टी कळत जातात, आता हेच पहा ना, लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात ईशान्य भारतातील चेरापुंजीमध्ये जगातील सर्वात जास्त म्हणजे वार्षिक सरासरी ५०० इंच पाऊस पडतो परंतु ह्या पुस्तकातून एक नवीन वाचायला मिळाले की, त्याच्या शेजारी असलेले मावसिंराम ह्या गावात वर्षाला सरासरी ७०० इंच पाऊस पडतो पण तिथे निरीक्षण करायला उपकरणं नाहीत म्हणून भूगोलाच्या पटलावर त्याची नोंद नाही. भन्नाट ना.... तर मग अशा गोष्टी ह्यात वाचायला मिळतात.
एकदा वाचायला हे पुस्तक ठीक आहे कारण कधी ईशान्य भारतात गेल्यावर नवनवीन गोष्टी पाहता येतील. जेणे करून आपल्या ज्ञानात भर पडेल. तसा हा प्रदेश दुर्लक्षित आहे. गरिबी पाचवीला पुजलेली असल्यामुळे पर्यटनावर येथील आर्थिक व्यवस्था आहे. त्यात असे प्रवासवर्णन हाताशी असेल तर बरेच प्रश्न सुटू शकतील.
No comments:
Post a Comment