महाराजांच्या मुलुखात - शिवकथाकार विजयराव देशमुख



पुस्तक परीक्षण

पुस्तकाचे नाव : महाराजांच्या मुलुखात

लेखक : शिवकथाकार विजयराव देशमुख

प्रकाशक : छत्रपती सेवा प्रतिष्ठान

मूल्य : २५०/-


हे पुस्तक फक्त एक प्रवासवर्णन नसून त्यात खूप सारी अभ्यासात्मक माहिती गुंफली आहे तसेच Exactly अभ्यास दौरा नेमका कसा असावा ? ह्यासाठी हे पुस्तक फार महत्त्वाचे आहे. ह्या पुस्तकाची खासियत म्हणजे लेखक अभ्यास दौऱ्यात असताना एका फटक्यात flashback मध्ये जाऊन पुन्हा आजच्या काळात येतो, हे कलात्मक आहे आणि मी म्हणेन, ज्याला हे जमते, तोच खरा अभ्यासक ! विजय देशमुखांची ही कलाकृती अजोड आहे.


ह्या पुस्तकात ऐतिहासिक स्थळांची भटकंती आहे परंतु त्याला अभ्यासाची जोड दिलेली असल्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे ठरते, मी प्रवासवर्णने भरपूर प्रमाणात वाचली आहेत पण हे पुस्तक मला वेगळे वाटले. इतिहासावर भरभरून प्रेम करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय रंजक ठरेल.   
 
दिनांक २ एप्रिल २०२० ला हे पुस्तक माझे पूर्ण वाचून झाले आणि काय योगायोग आहे पहा, ह्या पुस्तकात "प्रतापगडच्या परिसरात" म्हणून एक प्रकरण आहे, त्यात पहिली ओळ आहे "काही योगायोग मोठे गमतीदार असतात. आज चैत्र शुद्ध नवमी. प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवाचा दिवस !" आणि खरंच योगायोग असा की, काल २ एप्रिल, गुरुवार त्यात रामनवमीच होती. त्यात Corono curfew ची सुट्टी सत्कारणी लागत होती आणि मी त्याच प्रकरणापर्यंत पोहचलो होतो. असं काही जुळून आले ना की, मजा येते राव ! बरं तर मग हे पुस्तक आजच्या काळात फार महत्त्वाचे वाटते कारण बरेच जण भटकंती करत असतात पण ज्यांना अभ्यासात्मक भटकंती करायची आहे, त्यांच्यासाठी हे खास आहे.


भटकंती आणि अभ्यास जुळून आला तर ट्रिप नक्कीच सत्कारणी लावता येईल नाहीतर ट्रिपमध्ये दोन-चार सेल्फी आणि चेक इन करून आयुष्य जगत असाल तर मग तुमचे चालू द्या. 


 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960