काबुल कंदाहारकडील कथा - प्रतिभा रानडे


 


पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव : काबुल कंदाहारकडील कथा


लेखिका : प्रतिभा रानडे


प्रकाशन : रिया पब्लिकेशन


मूल्य : ₹ २४०/-



साधारणतः मी २०१४ ला मेस आयनाक म्हणून लोकप्रभामध्ये लेख वाचला होता तेव्हा पासून माझं मन त्या अफगाणच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकत असतं. कसा असेल हा शुष्क देश ? सतत युद्धजन्य परिस्थिती वगैरे वगैरे आणि त्यात नको त्या लोकांच्या हातात शस्त्र पडली, तर देश.... देश राहत नाही मग ते भयानक रक्तरंजीताचे ठाणं होते. जाणवत राहते सतत जेव्हा हे पुस्तक हाती पडते. 


हे पुस्तक सुरू होते, अमेरिकेत एकाच कॉलेजमध्ये असलेल्या अँना आणि अन्वरच्या love story ने ! अन्वर काबुली तर अँना अमेरिकन पण अधुरी एक प्रेमकहाणी होऊन जाते, असो तर विषय हा आहे की, अन्वर आर्किटेक्ट आहे आणि काबूलचा कायापालट करण्याचा त्याचा चांगला विचार आहे आणि ह्याच भोवती ह्यातील पहिले प्रकरण फेर धरते. पुढे प्रवास उलगडत जातो, अन्वर त्याच्या निकहासाठी मुंबईला आला होता आणि मग तो आग्र्याला गेला; ताजमहल पाहून तो बोलला, "ही सुंदर मजार मेलेल्या बायकोसाठी नाही तर स्वतःचे वैभव दाखवण्यासाठी त्याने बांधली आहे." Perfect बोलला अन्वर ! मी सहमत आहे राव ! कारण आमच्या सह्याद्रीत फिरताना हा ताजमहाल मला लिंबूटिंबू वाटतो. उगाच त्याचे कौतुक करण्यात काहींची हयात गेली आहे. असो ! विषयांतर नको. 

  

हे पुस्तक जबराट आहे, स्वतः लेखिका प्रतिभा रानडे मॅडम त्या अफगाणिस्तानात राहिल्या आहेत, ती युद्धजन्य परिस्थिती त्यांनी भोगली आहे. त्यामुळे वाचताना आपणच अफगाणमध्ये वावरत असतो. त्या खूप फिरल्या, अनेकांना भेटल्या आणि मग हे पुस्तक सिद्ध झाले. पुरातत्वात गोडी असणाऱ्या एका बाईला जेव्हा त्या भेटल्या तेव्हा त्या बाईचा नवरा मस्त बोलला. तो म्हटला की, "काही जागेत काय उरलंय हे महत्त्वाचे नसते तर काही जागांचे माहात्म्य असते", हे महत्त्वाचे आहे. खास.... एकदम खास.....


अहमदशहा अब्दालीला तिथे राष्ट्रपिता मानतात आणि प्रेमाने त्याला "बाबा" म्हणतात. आपल्या शत्रूला तिथे अशा पदव्या आहेत की, डोक्याची शीर उठते. पुढे पानिपत हे प्रकरण वाचताना मला एक वाक्य मिळाले. ते स्टॅलिनचे आहे, तो बोलतो की, "जेव्हा हजारो माणसं मारली जातात तेव्हा ती एक आकडेवारी असते पण जेव्हा एखादाच माणूस मारला जातो तेव्हा ती शोकांतिका असते."  हिंदुस्थानचे लुटारू आणि मुघल ह्या दोन विषयांची चर्चा पायंडाखान नामक एका मनुष्याबरोबर त्या करत होत्या. त्याला ह्या लुटीचे खूप भूषण वाटत होते. तो बोलतो की, ज्या बाबरला आम्ही अफगाणींनी पराभूत केले तो तुमचा सुलतान झाला व महमूद ह्या विषयावर तर तो थेट प्रश्नच करतो, आम्ही सतरा वेळा लुटायला आलो तेव्हा तुम्ही काय करत होते ? तेव्हा रानडे मॅडमने उत्तर दिले की, इतक्या वेळी लुटून सुद्धा तुम्ही आजही बऱ्याच देशांच्या मदतीवर जगत आहात. ज्जे बात ! एकही मारा लेकिन शोलीड मारा. 


ह्या पुस्तकात नुरजाद ह्या तरुणीची एक कथा आहे. प्रत्येक पुस्तकात मनाला काहीतरी लागतं, ते हे प्रकरण आहे. इस्लाम तिला कळला होता आणि ती बेधडक टिप्पणी त्यावर करते. खतरनाक आयुष्य ती जगली आहे, जे वाचताना सर्रकन काटा उभा राहतो. 


बरं तर मग हे पुस्तक भन्नाट आहे. हे प्रवासवर्णन नाही तर एक अफाट इतिहास लाभलेला देश पण धर्माच्या चौकटीत अडकून कसा दिशाहीन झाला त्याचा हा प्रवास आहे. माझ्या मते प्रत्येकाने वाचावे, असे हे पुस्तक आहे कारण तेव्हा गड्या ! आपला हिंदुस्थान बरा असं नक्कीच म्हणाल.


No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960