पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : अल्बर्ट आईनस्टाईन : काळाचे रहस्य भेदणारा कालातीत प्रतिभावंत
लेखिका : चैताली भोगले
प्रकाशन : कनक बुक्स
मूल्य : ₹१५०/-
तालबद्ध ठेक्यांवर पावलं टाकण्यात ज्यांना आनंद वाटतो, अशा माणसांची मला चीड येते. त्यांना माणसाचा महान मेंदू चुकून मिळाला असं वाटतं. अशा जिवांसाठी पाठीचा कणा पुरेसा झाला असता. बर्लिनमधील सैनिकांच्या परेडच्या बाबतीत आईन्स्टाईनने हा तर्क काढून ठेवला आहे. कमाल आहे ना ! खरंच हे बेणचं कमाल आहे..... एडिसनला bye biiii केले आणि त्याच संध्याकाळी आईन्स्टाईनने हात मिळविला मग काय चर्चा रंगत गेली अर्ध्या रात्रीत अर्ध पुस्तक संपले. हेही पुस्तक मला साहित्ययात्रेत ठाण्याला मिळाले. एडिसने मला आवाज दिला तेव्हा बाजूला हा अबोल बसला होता मग ही जोडीच घेऊन आलो घरी !
आईन्स्टाईन.... एक सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला हुशार मनुष्य ! वयाच्या पंधराव्या वर्षी शाळेला सोडचिठ्ठी दिली मग काय थेट कुटुंबाबरोबर राहायला आला पुन्हा काहीतरी शिकणं सुरू पण लहान वयात मोठा घास पुन्हा ठोकर ! मग प्रेमात पडणं, प्रेयसीला पत्र पाठवणं, करेन तर हिच्याच बरोबर लग्न करेन म्हणून ह्या अशा फिल्मी बाता आणि सरते शेवटी बाळ आणि मग प्रेमविवाह...... चित्रपटात शोभेल असा हा त्याच्या आयुष्याचा प्रवास आहे. तो सांगत होता आणि मला चित्रपट पाहण्याचा भास होत होता. मध्येच त्याला थांबवून हटक्या मुद्द्यांवर आणला तेव्हा कुठे कोडं उलगडले.
इस १८७९ सालातील त्याचा जन्म आहे आणि शास्त्रज्ञ म्हणून त्याच्यावर १९०५ साली शिक्कामोर्तब झाले. "प्रकाश म्हणजे काय ?" अशा आपल्यासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या विषयावर निबंध लिहिला. १९१६ साली आईन्स्टाईनचा सिद्धांत बरोबर आहे म्हणून मान्य झाले आणि १९२२ साली भाईला नोबेल पारितोषिक मिळाले. ह्यात ह्याने मला खूप गमती सांगितल्या, सर्वच इथे सांगता येणार नाही पण एक मात्र मजा आहे. तो म्हटला कि, A New Determination of Molecular Dimensions नावाचा शोधनिबंध PhD साठी झ्यूरीक विद्यापीठाकडे मी पाठवला होता पण तो खूप छोटा आहे म्हणून नाकारण्यात आला. १९०६ ला त्यात फक्त मी एक ओळ add केली आणि पाठवला बस् झालो ना, भाऊ डॉक्टर.... मी म्हटले, हुशार लोकांची बातचं निराळी राव !
पाच शोध निबंध लिहूनसुद्धा ऑफिसमधून कारकून नोकरी त्याने सोडली नव्हती. तो जे करतोय त्याचा थांगपत्तासुद्धा त्याने ऑफीसमध्ये लागून दिला नाही. काय बोलणार ह्याला.... तर मग एक दिवस असाच विचार करताना, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण विषयी काही विचार त्याच्या डोक्यात आले, त्याने त्या विचारांना Most happiest thought in my life म्हणून त्यांचे वर्णन केले हेच thought सोडवायला त्याला आठ वर्षे लागली. आईनस्टाईन सांगत होता आणि मी शांतपणे ऐकत होतो. बोलबोलता त्याने एक घटना सांगितली आणि माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा त्याचे कायमचे वास्तव्य स्वित्झरलँडला होते. तेव्हा एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने दिवस ठरवला होता. येणाऱ्या १२ ऑगस्ट १९१४ला सूर्यग्रहण होते आणि खास त्या दिवशी रशिया मधून ते पहायचे त्याने ठरवले होते कारण प्रकाशाचा तिरपेपणा त्याला पाहायचा होता, जो तेव्हाच दिसणार होता पण त्याला बर्लिनमधून घसघशीत पगाराच्या नोकरी चालून आली, बराच विचार करून offer घेतली आणि आईनस्टाईन इथेच ढळला. ज्या देशात सैनिकांची परेड पाहून शिसारी आली होती त्या देशात त्याने पुन्हा पाऊल ठेवले. संशोधनात गढून गेलेल्या ह्या भाईचे पत्नीबरोबर खटके उडायला लागले आणि दोघांची ताटातूट झाली ती कायमची...... युद्धाची आरोळी उठली आणि त्याच्या सूर्यग्रहणावर प्रयोग करणाऱ्या मित्राला क्रायमियामध्ये अटक झाली. दुर्बीणींची तोडफोड करण्यात आली आणि प्रयोग बारगळला. झपाटलेल्या आयुष्यात आईनस्टाईन नाराज झाला. जेव्हा आपण नाराज होतो ना, तेव्हा कामात इतके गढून जायचे की, नाराजमधील "ना" सुद्धा आपल्याला शिवायला येत नाही. तो सहज बोलत होता, मी त्याची मुद्रा टिपत होतो. काही वर्षात ब्रिटनमधून आईनस्टाईनने मांडलेली थेरी exact आहे म्हणून पडताळली गेली आणि आईनस्टाईनला तिथून तार आली. तेव्हा तो क्लासरूममध्ये होता. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. लागलीच तिथे उभ्या असलेल्या विद्यार्थिनीने कुतूहलाने विचारले की, त्यांचे आकडे चुकले असतील तर..... ह्या भाईने उत्तर दिले की, "तर मला परमेश्वराची दया आली असती, कारण माझं गणित तर बरोबरच आहे." मी म्हटले, च्यायला याला म्हणतात attitude..... हा खास आहे, बघा ना ! आता १९२१ ला हा जगभ्रमंतीसाठी बाहेर पडला तेव्हा बऱ्याच जणांना कळले की, भाऊला इंग्लिश येत नाही. बरं असो तर हा हुशार आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे बोलणे संपूच नये असे वाटत होते. तो भन्नाट वाक्य टाकत होता आणि मी फाटक्या झोळीत ती गोळा करत होतो. त्यातल्या त्यात जी राहिली ती इथे मांडली.
ज्ञानापेक्षा महत्त्वाची असते कल्पनाशक्ती ! ज्ञान केवळ आपल्याला माहीत असलेल्या आणि समजू शकणाऱ्या गोष्टींपुरतंच मर्यादित असतं पण कल्पनाशक्ती मात्र सगळ्या विश्वाला कवेत घेते. बस् कुतूहल हवं, दुसरं असं हुशारीच कारण काहीही नसते. असे बोलत आईनस्टाईन मला सोडून गेला आणि जाताना मात्र प्रिन्सटन हॉस्पिटलने त्याच्या मेंदू काढून घेतला...…
हे पुस्तक खास आहे. संग्रही ठेवायला काहीच हरकत नाही कारण ही भन्नाट माणसं आपले आयुष्य कळत-नकळत घडवत असतात. त्यात त्यांची आपल्या study room मधील हजेरी आपल्याला स्फूर्ती देऊन जाते. छोट्या मुलांना त्या काऊ-चिऊच्या गोष्टी सांगण्यापेक्षा शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगितल्या तर खूप काही चांगले results मिळतील, हे खरे आहे. त्यासाठी हे पुस्तक घरी हवेच.
No comments:
Post a Comment