दक्षिणेचा लोकदेव खंडोबा - रा. चिं. ढेरे

 



पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव : दक्षिणेचा लोकदेव खंडोबा


लेखक : रा. चिं. ढेरे


प्रकाशन : पद्मगंधा


मूल्य : ₹ २२०/-


भैरवनाथाचं अवतार देवा तूच मल्हार...... 

खंडोबा ! मग एकीकडे आपल्या समाजात अडलेल्या कामाला खेळ-खंडोबा म्हणतात दुसरीकडे त्याची कुलदैवत म्हणून पूजा सुद्धा करतात. जवळ जवळ प्रत्येकाच्या घरात खंडोबाचे टाकं आहे कारण तो आपल्या कुलदैवतात विराजमान आहे. लहानपणापासून मी ह्या देवाला पाहत आलो आहे. तळी भरताना तो हळदीने बरबटलेला खोबऱ्याच्या तुकडा मिळवणे, अहाहा ! ती मजा काही औरच.... लहानपणा देगा देवा.... तर ह्या खंडोबाविषयी बरंच काही जाणून घ्यायचे होते आणि त्यासाठी चाललेल्या खटाटोपाला ह्या पुस्तकाने पूर्णविराम दिला.



खंडोबा अगदी नावाप्रमाणे मनात आकृती तयार करणारा एक बलाढ्य देव ! बाजूला कुत्रा आणि घोड्यावर स्वतःच्या पत्नी समवेत आरूढ होऊन निघालेला एक धनगर....  भन्नाट वाटतं राव ! तर हा खंडोबा कुलदैवतात असल्यामुळे त्याचा कुळाचार ठीक व्हायलाच पाहिजे असे प्रत्येकाला धार्मिक भावनेतून वाटते. त्यात आमच्या इथे लग्नाच्या वेळी "देव समजावणे" अशी प्रथा आहे. त्यात गावातील एक (हुशार) मनुष्य ती जबाबदारी पार पाडतो त्यात त्याचा मान वेगळा ! तो काय समजावतो हे अद्याप मला तरी कळले नाही. असो ! खंडोबाला बहुतेक समजत असेल. ते कोडं काही प्रमाणात इथे सुटते. लग्न झाल्यावर त्याच्या नावाने घातलेला जागरण गोंधळ ही तर गावासाठी पर्वणी असते कारण त्याचा नैवद्य मटणाचा असतो. काही ठिकाणी वाघ्या-मुरळी येतात, नाचकाम चालतं. रात्रभर जागवून पहाटे लंगर कडी तुटते आणि मग आपली बिदागी घेऊन ते निघून जातात ही जरी आनंदाची बाब असली तरी दुसरी बाजू म्हणजे त्यांचे आयुष्य ! touching आहे ! काही गोष्टी पटत नाहीत पण प्रथा असल्यामुळे पार पाडल्या जातात, त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या पुस्तकात मिळातात. त्यात तळी कशी भरावी आणि कधी भरावी ? तसेच खंडोबाच्या प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी नेमके कसे उत्सव होतात ? आणि त्यांचे माहात्म्य कसे आहे ? जी सर्व माहिती म्हणजे हे पुस्तक !


 

एकंदरीत हे पुस्तक जबरदस्त आहे. वाचायला थोडं किचकट जातं पण त्याला गत्यंतर नाही, स्वतःच्या कुलदैवताविषयी जाणून घ्यायची आवड असेल तर हा प्रवास सोपा होत जातो. भरगोस संदर्भग्रंथ घेऊन हे पुस्तक ढेरे सरांनी अभ्यासात्मक रचले आहे. ज्याला हे सर्व जाणून घ्यायचे आहे, त्यांच्या संग्रही असायला पाहिजेच. अधिक काय तर हा देव आपल्या कुलदैवतात आहे, त्याचा इतिहास जाणून सर्व कुळाचार व कुळधर्म रीतसर करणे म्हणजे १००% सुफळ संपूर्ण...

जय मल्हार !


1 comment:

  1. An glorious place to start out|to begin} is slots, as most on-line casinos will give you free spins on a promotional recreation. They are glorious sources of entertainment with the possibility to earn some money. For peace of mind, Super Slots is RNG certified, which implies it has taken that extra 바카라 사이트 step guarantee that|to make certain that} all actual money games introduced are genuinely random and truthful. The applied sciences leveraged by the cell gaming on line casino industry have supplied clients with immense ease and convenience. It presents a reside on line casino, cell gaming, broad variety|all kinds} of your favorite games, and a lot extra to its clients.

    ReplyDelete

INSTAGRAM FEED

@sagar7960