शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे - प्रा. यशवंत गोपाळ भावे

 




पुस्तक परीक्षण


पुस्तकाचे नाव : शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे


लेखक : प्रा. यशवंत गोपाळ भावे


प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन


मूल्य : ₹१२५/-



एक वेगळ्या विषयाचे पुस्तक आहे हे ! हे पुस्तक मला साहित्य जत्रा बदलापूरमध्ये मिळाले. हा असा विषय आहे की, हिंदुत्व टिकविण्यासाठी ही वर्षे अत्यंत महत्त्वाची होती, जी लेखकाने अगदी चपखलपणे मांडली आहेत. ह्या पुस्तकाची खासियत मी म्हणेन की, ह्यामध्ये अनेक शोधनिबंधाचे त्यांच्या नावासकट मुद्दे मांडलेले आहेत, जे वाचताना नव्याने दृष्टी देतात आणि साहजिकच वाटून जाते की, इस १६३० ते १६८० म्हणजे छत्रपती शिवराय नव्हेत तर १६८० ते १७०७ म्हणजे छत्रपती शिवराय होय !  हे एक भन्नाट पुस्तक आहे हे कारण ह्याच्या पहिल्याच पृष्ठावर अगदी मधोमध "सर्व जागरूक देशभक्तांस...." अशी हाक दिली आहे आणि मग अपेक्षेप्रमाणे काहीतरी खास आपण वाचतोय, ही इच्छा पूर्ण होते.



छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातुन अनंतात विलीन झाले आणि मग "सब शिवाजी" असे म्हणत घराघरातून धर्मवेड्या औरंगजेबाला 'दे माय धरणी ठाय' करून सोडला. मुळात हा धर्मवेडा इथे राज्याची सीमा वाढवायला नव्हे तर महंमद बिन कासीमने सुरू केलेले भारताचे इस्लामीकरण पूर्ण करायला आला होता, हे आपल्याला उमजतेपर्यंत आमच्यावर "धर्मभेद करतो" म्हणून शिक्का बसलेला असतो. असो ! सत्य कटू असते आणि तेच स्वीकारणे गरजेचे आहे कारण इतिहास तटस्थ अभ्यासला जातो, हे कळायला हवे. तर मग ही वर्षे आणीबाणीची कशी होती ? ह्यावर ह्या पुस्तकात खूप बारकाईने विवेचन मांडले आहे. 

कासीमने केलेले अत्याचार, बाबरने खेळलेली भयानक लढाई, अकबराने ढासळवलेली राजपुतांची मानसिकता, जहांगीराने फोडलेली देवालये, हिंदूंचा केलेला अमाप छळ आणि ह्या सर्वांची री ओढत धर्मवेड्यापायी औरंगजेबाने रचलेला अत्याचाराचा कळस अगदी सर्वांची माहिती ह्या पुस्तकात दिलेली आहे आणि मग वाटतं की, छत्रपती शिवाजी महाराजांची entry का महत्त्वाची होती ?



ह्या पुस्तकात एक वाक्य आहे ते वाक्य प्रिंगल केनेडी ह्यांच्या The History of the great Mughals ह्या ग्रंथातून घेतले आहे, ते म्हणतात "ज्यांनी हिंदू समाजाचा विश्वास संपादन केला नाही अशा कुठल्याही राजवटी भारतात टिकून राहण्याची अपेक्षा करू शकत नाही." ह्यात सर्वच काही आले. आता त्यावर अधिक काही लिहीत बसत नाही पण ससंदर्भाने भरलेले अशी पुस्तकं आपल्या विचारांची शान असते व हे असे प्रगल्भ विचार आपले जगणे सार्थकी लावतात. माझ्या मते, प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे तसेच जे लोक मराठेशाहीचा अभ्यास करत असतील त्यांच्या संग्रही हे पुस्तक कोणत्याही परिस्थितीत असायलाच पाहिजे, असा हा ठेवा आहे. 


No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960