पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : रानवाटा
लेखक : मारुती चित्तमपल्ली
प्रकाशक : साहित्य प्रसार केंद्र, नागपूर
मूल्य : ₹ १५०/-
जे सांगता येत नाही, ते कोणीतरी रेखाटतं आणि जे रेखाटता येत नाही ते कोणीतरी लिहून काढतं. कमाल आहे हे पुस्तक ! मारुती चित्तमपल्ली ह्यांना वनमहर्षी का म्हणतात ? त्याचा प्रत्यय यायला हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ! हल्ली एक ट्रेंड आला आहे जंगलातून अमुक पाहिले, तमुक पाहिले, इथून उतरलो, तिथून उतरलो, लय पकतो राव मी ह्या अशांना.... मग मनात येते जंगल पाहिलेस का..... ? त्याला वाचलेस का ? त्याच्या फील घेतलास का.....? नाही ना, मग काय उपयोग ! तसं पण The world is jungal you either fight or run forever.
ज्यांना जंगलात फिरायला आणि त्याचा आवाज ऐकायला आवडतो ना, त्यांच्यासाठी हे पुस्तक जंगल होऊन बसतं. कित्येक नवीन गोष्टी कळतात आणि आपल्या फिरण्याला अर्थ प्राप्त होतो. आता हेच पहा ना, हत्ती उंटांना घाबरतात, ते पाळले की, हत्ती लांबूनच निघून जातो. इंग्रजांनी साग वाचवण्यासाठी ही ट्रिक केली होती तसेच रानहत्ती त्यांच्या मृत्यू समीप आला की ते जलसमाधी घेतात. कमाल आहे राव !
जंगलात पळसाला फुलांचा बहर आला की, रानाला जणू वणवा लागला आहे असे वाटते. अहाहा फील यार फील..... फुलपाखरूविषयी मस्त व्याख्या केली आहे, कुरूपतेतून जन्माला आलेले सौंदर्य..... अशा कित्येक गोष्टींनी आपल्याभोवती फेर धरलेला असतो आणि आपण त्यात मंत्रमुग्ध झालेले असतो.
जंगलाचे अपत्य म्हणजे पारधी व आदिवासी आणि त्यांचे जंगलाविषयी असलेले अगाध ज्ञानाचा लेखकाला खूप फायदा झाला त्यात दिवारू प्रकरणातील दिवारू खूप भावला राव ! तो जेव्हा त्याच्या वार्ध्यक्यात मारुती चित्तमपल्लींना भेटायला आला तेव्हा त्याने म्हटले की, "जीवन पाण्याचा बुडबुडा हाय, कधीही फुटायचा...." touching
रात्री काहींना जंगल भयाण वाटतं तसे काही नग आहेत ज्यांना दिवसाही भयाण वाटतं, असो पण रात्रीचे वर्णन करताना लेखक म्हणतो, "बाहेर जंगल दिसत नसलं तरी ते ऐकू येत होतं." बारीक गोष्ट जी डोळ्यांपुढे उभ्या राहिल्या. अशा कित्येक गोष्टी वाचायला मजा येते, मी हे पुस्तक संध्याकाळी वाचायला घेतले आणि जेवणाची सुट्टी सोडली तर रात्री दोनला पूर्ण झाले. अनेक गडांवर अथवा त्याच्या पायथ्याच्या अरण्यात फिरताना ह्यातील घटना आता माझ्या आयुष्याची शिदोरी झाली आहे.
किती साधी गोष्ट आहे बघा ना, शाल्मली म्हणजे आपली सावरी ह्यावर अख्खे एक प्रकरण आहे ह्यात ! त्यावर कावळ्याने घरटे केले तर पाऊस कमी पडतो, असे वराहमिहीर म्हणतो. तर गावाच्या वेशीवर सावरी लावायची असते, असे कौटील्य म्हणतो. खास.... बोले तो एकदम झक्कास निरीक्षण
पुस्तक संपताना मात्र मनाला चटका लागतो, जेव्हा लेखकाने वृक्ष पेटवला जातो, ह्याचे वर्णन केले आहे, तिथे अश्रू ओघळले ओ..... अशा कित्येक गोष्टींमुळे हे पुस्तक मस्त झाले आहे, खरंच ज्यांना जंगलाची आवड आहे ना, त्यांनी नक्की वाचून काढा व संग्रही ठेवा. इतके बारीक निरीक्षण जमले ना मग जंगल भयाण नाही तर प्रेमळ वाटायला लागेल आणि तुमचा दृष्टिकोन बदलेल. शेवटी काय, तर मॉरिस बोलला आहेच, The city is not a concrete jungal, it is a human zoo.
No comments:
Post a Comment