पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव : पुतीन : महासत्तेच्या इतिहासाचे अस्वस्थ वर्तमान
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशन : राजहंस
मूल्य : ३२५/-
राजकारणात पुतीन हा सध्याचा माझा क्रमांक दोनचा आवडता नेता आहे. पहिल्या क्रमांकावर आपले नमोच ! पण जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा हिटलर, स्टालिन आणि लेनिन एक भन्नाट attitude असलेल्या माणसांवर जेव्हा वाचायला मिळायचे तेव्हा जबराट मजा येत होती. काळ बदलला आणि जगाच्या राजकारणात पुतीन आला आणि मग काय त्याच्या बद्दल माहिती घ्यायला आणि चर्चा करायला अहाहा.... शब्दबद्धच करता येत नाही राव ! पण त्याच्यावर वाचायला असे ठोकळा पुस्तक मिळत नव्हते जे आता मिळाले आणि मागील तीन दिवस त्याच्याबरोबर जगलो, हे पुस्तक ओंकारचे आहे त्याचे वाचून झाले आणि मग मी वाचायला घेतले. त्याच्याच काही गमतीजमती....
सगळीकडचे राजकारणी सारखेच असतात. ओलांडण्यासाठी नदी नसली, तरी तिथे पूल बांधण्याचं आश्वासन ते देतात. निकिता ख्रुश्चेव्ह खणखणीत वरील वाक्य बोलतो आणि तो पर्यंत ह्या पुस्तकाची दोन प्रकरणं माझी आटपलेली असतात. लेनिनची विकेट गेलेली असते आणि गुढरित्या स्टालिन नुकताच गेलेला असतो. हुश्श..... मग छोटेमोठे राजकारणी आपल्याला मध्ये मध्ये भेटतात आणि मग entry होते एका दगडी चेहरा आणि हावभाव नसलेल्या माणसाची तो म्हणजे ब्लादिमिर पुतीन ! मग सुरू होतो, सबकुछ पुतीनचा जप...... मला नेहमी असे वाटते की, जगाच्या इतिहासात एक टीम एकाच वेळी येते आणि संपूर्ण जगात त्यांचा डंका पिटला जातो. हळूहळू ह्या टीममधील एक्के गळत जातात आणि तो पर्यंत संपूर्ण जग त्यांच्या भोवती वेडं झालेले असते. अगदी सातवाहनांपासून ते आज पर्यंत असेच तर होत आहे. बरं असो !
ह्या पुस्तकात पुतीन राजकारणात कसा आला आणि आल्यानंतर जो शत्रूवर कुरघोडी करण्यासाठी जो काही धडाका त्याने लावला, तो आजतागायत संपलेला नाही. राजकारणात शत्रूला कसा हाणायचा आणि कोणाला कधी जवळ करायचे ह्या सर्व गोष्टींची माहिती ह्या पुस्तकातून इत्नभूत आपल्याला मिळते. राजकीय भूक भागवण्यासाठी तोंडी लावायला पैसा लागतो ह्या सूत्रानुसार मग तो कसा मिळवला व कसा वापरला ? ह्यावर ह्या पुस्तकात संपूर्णपणे प्रकाश टाकला आहे. मजा येते राव ! पुतीनने जे पत्ते हलवले आहेत ना, त्याला तोड नाही. मी म्हणेन, शत्रूला नेहमी चिरडायचे असते. जे "शत्रूवर प्रेम करा" म्हणतात, त्यांच्या सारखे मूर्ख तेच ! तर हा पुतीन रशियाला महासत्ता करण्यासाठी जे काही करत आहे त्याचा आढावा म्हणजे हे पुस्तक ! गिरीश कुबेरांनी ह्या पुस्तकात भारदस्त वाक्य गुंफून जी कलाकृती सादर केली आहे, ती नक्कीच राजकारणाची आवड असणाऱ्याला पसंत पडेल.
एक वेगळ्या धाटणीचे असलेले हे पुस्तक जगाचे राजकारण ढवळणाऱ्या पुतीनवर आहे आणि तेही बऱ्याच संदर्भाने लिहिलेले आहे कारण पुस्तकाच्या शेवटी संदर्भसूची वाचायला मिळते, एकंदरीत भारदस्त माणसाचे भारदस्त पुस्तक आहे हे ! आपल्या देशाचे राजकारण आपण नेहमीच पाहत असतो पण परदेशातील राजकारण नेमके कसे चालते ? त्यात आपल्या राष्ट्राला कसा फायदा होतो ? किंवा त्याचे दूरगामी परिणाम नेमके कसे होतात ? अशा बऱ्याच मुद्द्यांचा उहापोह आपल्याला करता येतो. इतिहासातील काही गोष्टींची सांगड इथे घालता येते आणि कडक मत आपल्याला बनवता येते. ग्रेट आहे पुतीन !
कुबेरांचे लिखाण म्हटले कि, बऱ्याच वाक्यांची भर आपल्या ज्ञानात पडते आणि दुसऱ्या बाजूला जगाचे राजकारण नेमके कसे चालले आहे ? हे ही समजते. तर हे पुस्तक संग्रही ठेवायला हरकत नाही.
No comments:
Post a Comment