ऐतिहासिक पाऊलखुणांच्या कर्जतची ओळख





कर्जत ! सह्याद्री पर्वतरांगांच्या वेढ्यात असलेले टुमदार गाव ! कर्जतची ओळख आज दुर्दैवाने पावसाळी धबधब्यांसाठी जरी झाली असली तरी हे गाव ऐतिहासिक पाऊलखुणांनी नटलेले आहे. गड आणि लेण्यांनी आभूषित झालेले आहे. आम्ही इतके भाग्यवान आहोत कि, छत्रपती शिवरायांनी कल्याणला ज्या नदीत आरमार स्थापन केले ती उल्हास नदी आमच्या कर्जतच्या अंगाखांद्यावर बागडत सागराच्या ओढीने कल्याणच्या खाडीला मिळते. इसवी सन पुर्वातील व इसवी सनातील लेणी ह्याच आमच्या गावात कोरण्यात आल्या.



घाटावरच्या प्राचीन व्यापारी वाटा ह्या कर्जतमध्ये उतरून सार्थवाहक, धर्मप्रसारक, व्यापारी आणि यात्रेकरू ह्या गावाच्या लेणीत क्षणभर विश्रांती घेऊन पुढे विविध बंदरांकडे मालाचे तांडे घेऊन जात असत. काळ बदलला आणि ह्या आपल्या कर्जत नगरीच्या चारही बाजूला गड उभे राहिले पुन्हा तेथील युद्धजन्य परिसर ! तोही काळ सरला आणि इंग्रजांच्या काळात इथे काही वास्तू उभ्या राहिल्या, विविध काळ समर्थपणे पाहणाऱ्या ह्या वास्तू आजही उभ्याच आहेत आणि म्हणूनच त्यांची माहिती घेऊन आपण हा ठेवा वैचारिक पद्धतीने जपणार आहोत.



कर्जतमध्ये असलेल्या ह्या पाऊलखुणांमध्ये येथील विविध चौक कसे मागे राहतील तर आपण ह्या विविध चौकांचीसुद्धा माहिती घेणार आहोत. ह्या आमच्या गावात काही स्वातंत्रसैनिक होऊन गेले. काही मान्यवर मंडळींची एकसौएक भाषणं इथे झाली, त्या जागांचा आढावा आपण घेणार आहोत. Interesting ना.... ह्या विभागात आपल्याला ह्या सर्व मुकं वास्तूंना बोलकं करायचं आहे.


 

कर्जतची ओळख आज फार्महाऊस सिटी केली जाते. अंशतः जरी ते खरे असले तरी त्या आधी इथे ऐतिहासिक गोष्टी होत्या, आज त्या मात्र विस्मरणात जात आहेत. ह्याच गोष्टी लोकांसमोर आणण्यासाठी ऐतिहासिक पाऊलखुणांचे कर्जत ह्या पेजची मी निर्मिती केली. चला तर मग अधिकाधिक लोकांसमोर आपल्या कर्जतच्या ऐतिहासिक पाऊलखुणा आणूया. फार्महाऊस सिटी, धबधब्यांचे शहर हि ओळख पुसून खरी ओळख करून देऊया.



फक्त एक विनंती आहे कि, आपले हि साईट जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी share करा. जेणे करून आपल्या गावाचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचेल. 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960