वैभवशाली विजयनगर साम्राज्य - एन. शहाजी

 



पुस्तक परीक्षण

पुस्तकाचे नाव : वैभवशाली विजयनगर साम्राज्य

लेखक : एन. शहाजी

प्रकाशन : विरुपाक्ष

मूल्य : ₹ ५५०/-


हे पुस्तक मला कोल्हापूरमधील मेहता पब्लिकेशन ह्या दुकानात मिळाले. ह्या आधी विजयनगरची खूपच जुजबी माहिती होती परंतु आता मात्र सर्व चित्रच clear झाले. माहिती घेतल्याशिवाय विजयनगरला जायचे नाही ठरवले होते. आता मात्र तिथे जाण्याची ओढ लागली आहे. बरं असो ! तर मग हे पुस्तक पाहता क्षणीच प्रेमात पाडते. उत्कृष्ट बांधणी आणि संपूर्ण रंगीत असलेले glossy पृष्ठ ! आणि मुखपृष्ठ म्हणाल तर mat finish with embossed. अहाहा.... फुल्ल चाबूक की राव ! इथे दुधात साखर पडते जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो.... का, माहीत आहे ? कारण पहिलचं पान आताचे वंशज कृष्णदेवराय यांचा शुभसंदेश घेऊन येते. त्यानंतर सह्याद्रीच्या काळजातून आपले बाबासाहेब बोलायला लागतात नंतर विजयनगरची वाट पकडून देगलूरकर सर आपल्याला घेवून जातात. तो पर्यंत देवगिरीच्या मुलखातून रा. श्री. मोरवंचीकर आवाज देतात. एकावर एक साखरेचे खडे दुधात घोळवून सरते शेवटी हा गोड अमृतप्याला आपण रिता करतो. 

 
हे पुस्तक मी संध्याकाळी वाचायला घेतले आणि पहाटे साडे चार वाजता नोट्स काढून ही विजयनगरची सफर पूर्ण झाली. मध्ये रात्रीच्या जेवणाची सुट्टी सोडली तर हे पुस्तकाने मला अक्षरशः खिळवून ठेवले. ह्यात सर्वच गोष्टींचा परामर्ष घेतलेला आहे. त्यावेळचे राजदरबार, विविध मंदिरांचे स्थापत्य, त्यावरील शिल्प त्या जवळ असलेल्या पुष्करणी आणि जगभरातून सर्वच गोष्टी विकत घेण्यासाठी ओतप्रोत भरलेली बाजारपेठ ! रात्रीच्या शांततेत हे चित्र डोळ्यांपुढे तरळत होतं. १५व्या शतकातील सर्वात संपन्न आणि श्रीमंत बाजारपेठ म्हणून विजयनगरची बाजारपेठ नाव मिरवीत होती. विलासी वृत्ती वाढली की, राष्ट्र पारतंत्र्यात जाते, असे  चटका लावणारे वाक्य कुठेतरी वाचलेले मला आठवला आणि होत्याचे नव्हते व्हायला वेळ लागला नाही. इस १५६५च्या राक्षसतंगडीच्या (तालिकोट) लढाईत इस्लामी सत्ता एकत्र आल्या आणि संपन्न विजयनगर हिंदुराष्ट्राचा अस्ता केला. रामरायाचे स्वतःचे असे दोन हजार मुस्लिम सैनिक आयत्यावेळी फितूर झाले आणि त्याचे शीर कलम करून ह्याच विजयनगरमध्ये मिरवीत सांडपाण्याच्या मुखावर लावले. पुढील सहा महिने विजयनगर अत्याचार आणि लुटीत बुडाले आणि विजय फक्त नावातचं उरला. पुढील काही शे वर्ष हिंदूंचा कुठेही जय नव्हता आणि देवांचा जयजयकारसुद्धा नव्हता आणि अशा वेळी ह्या अत्याचारी व जुलमी इस्लामी राजवटींना तोंड देण्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.


हे पुस्तक वाचताना आपण वाचतोय असे कुठेही वाटत नाही. आपण सैर करतोय आणि त्या मुर्त्या आपल्याशी संवाद साधत आहेत तसेच त्यांच्यावर मुस्लिमांनी केलेले अत्याचार आपल्याला सांगत आहे, असे वाटते. त्यावेळी इथे आलेल्या पर्यटकांच्या इत्नभूत नोंदी आज आपल्याला फायद्याचे ठरल्या आहेत. त्यात पोर्तुगालचा डोमिंगो पेसने तर जबराट नोंदी मांडल्या आहेत. तो भटकळमार्गे विजयनगरला आला होता. तो म्हणतो, विजयनगर रोमपेक्षाही भव्य शहर आहे. एका फटक्यात इथे विजयनगरची श्रीमंती दिसून येते. तर असे बरेच पर्यटक येऊन गेले आणि त्यांनी केलेल्या नोंदी ह्या पुस्तकात वाचायला मिळतात.
हे पुस्तक संग्रही असावे असे आहे कारण मी म्हणेन की, त्याशिवाय विजयनगर अभ्यास दौरा पूर्ण होणार नाही.



No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960