मआसिर-ए-आलमगीरी - साकी मुस्तैद खान - मराठी अनुवाद : रोहित सहस्रबुद्धे


 

पुस्तक परीक्षण

पुस्तकाचे नाव : मआसिर-ए-आलमगीरी

लेखक : साकी मुस्तैद खान

मराठी अनुवाद : रोहित सहस्रबुद्धे

प्रकाशक : मराठा एम्पायर

मूल्य : ₹ ५९५/-


औरंगजेब नीच आहेच पण तो किती extreme level ला नीच आहे, हे समजून घ्यायचे असेल तर त्याच्याच दरबारात त्याच्याच आदेशाने लिहिले गेलेले मआसिर-ए-आलमगीरी हे वाचणे अनिर्वाय आहे. इतिहासाचा अभ्यास करताना शत्रूची बलाढ्यता जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत आपल्या शिवप्रभूंचा आणि मावळ्यांचा पराक्रम आपल्याला उमजणार नाही, हे लक्षात घ्या कारण ऐतिहासिक घटना समजून घेण्यासाठी दोन्ही बाजू अभ्यासून आपले मत तयार करावे लागते आणि तेच फार महत्त्वाचे असते.


रोहितरावांचे हे पुस्तक जबरदस्त आहे. काहीही अलंकारिक नाही जे आहे ते सढळ लिहिलेले आहे. अशा पुस्तकांची आमच्यासारख्या अभ्यासकांना नितांत गरज आहे. औरंगजेब किती धर्मांध होता. त्याच्या ह्या वेडाने आपली कित्येक मंदीरं त्याने जमीनदोस्त केली त्यांचे आकडे इथे वाचताना आपल्याला आकडी येते. कैद होणाऱ्या माणसांना तो मुस्लिम करत असे तसेच आपल्या राजांच्या अथवा सरदारांच्या कन्यांची लग्न तो आपल्या सरदारांच्या मुलांबरोबर लावत असे. साहजिकच जन्माला येणारे अपत्य मुस्लिम होत असे. अशा कित्येक कृती तो थंड डोक्याने करत असे म्हणून तो विकृत आहे. मंदिरं पाडल्यानंतर तिथे असलेल्या मूर्ती गाडीत भरून आग्र्याला आणून त्यांना मशिदीच्या पायऱ्यांमध्ये टाकलेला उल्लेख ह्या पुस्तकात येतो आणि खरंच आपल्या डोक्याची शीर उठते. इतका हा धर्मांध मनुष्य आहे.


जगाच्या इतिहासात राजकीय पटलावर तब्बल ५० वर्षे, २ महिने आणि २७ दिवस इतकी कारकीर्द त्याने गाजवली आहे. ह्या दीर्घ कालखंडामुळे त्याच्या मुलांना गादी मिळालीच नाही आणि ह्यात त्याच्या राज्याचे नुकसान झाले, हे त्याच्या लक्षात आले नसेल का ? मी तर म्हणेन हा लालची आहे लालची ! त्यात ह्या मोठ्या कालखंडात मराठ्यांना संपवायला ह्याने १६८१ला अजमेरमधून बुऱ्हाणपुराकडे कूच केले व तो परत कधीही दिल्लीला जाऊ शकला नाही. आदिलशाही जशी त्यानी चटकन फस्त केली तशी मराठेशाही संपवता आली नाही अगदी मराठ्यांचा राजा कैद झाला व कुराणाप्रमाणे त्याची हत्या त्याने केली, राजपुत्र कैदेत होता पण मराठे झुकले नाहीत, गड जात होते त्यांचे मुस्लिम नामकरणे होत होती परंतु आपला आत्मविश्वास डळमळीत झाला नाही. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावर झाल्याचे दिसून येतात.


हा वेडा धर्माने इतका पछाडलेला होता कि, काफिरांना तो गलिच्छ शब्दप्रयोग करत असे. हिंदवी स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे नाव लिहिताना आदरार्थी "जी" वगळणे आणि त्यांच्या नावाच्या आधी घाणेरडा शब्द लिहिला जात असे, इतका तो घसरला होता. त्यात मराठ्यांचा उल्लेख "चोर अथवा लुटारू" करावा असा आदेश त्याने काढला होता. राजकीय चौकटीत ह्याला शिष्टाचार अजिबात माहित नव्हता.


शत्रूकडे पण काही बाबी आपल्याला शिकण्यासाठी उपयुक्त असतात ह्यात त्याच्याकडून आपल्याला एक शिकता येईल ते म्हणजे सदानसदा हा कामात गढलेला असे. अगदी काबूलपासून दक्षिणेत विजापूरपर्यंत कोणाला शाबासकी द्यायची ? कोणाला दणकवायचा ? इथपर्यंत तसेच कोणत्या गडावर आक्रमण करायचे त्यात कोणाला अपत्य झाले की, त्याचे नामकरण सुद्धा हाच करायचा. तेव्हा वाटते की, अरे हा किती व्यापी आहे पण ते करताना तो थकत नव्हता, हे मात्र आहे. इतकं manage करून सुरुवातीला तो संगीत ऐकायचा पण जेव्हा त्याला कळले की, हे निषिद्ध आहे तेव्हा पासून त्याने ते ऐकणे सोडले. काय म्हणाल आता, tempting गोष्टी फाट्यावर मारणे. खाऊ आहे का ? पण ह्या निच्चडने ते केले, हे शिकण्यासारखे आहे.


बरं तर इतकं सर्व documented असताना जर हा काहींना सुफी संत वाटत असेल तर त्या लोकांची कीव येते राव, असो! वादात न पडता हे पुस्तक तटस्थ इतिहास अभ्यासकांच्या संग्रही हवेच, ह्यात दुमत नाही. ह्या सर्व अस्सल दस्तावेजाचे लिखाण साकी मुस्तैद खान ह्याने केले असून त्याचे भाषांतर रोहित सहस्रबुद्धे ह्यांनी केले आहे. हे शिवधनुष्य होते जे लीलया लेखकाने पेलले, असेच म्हणावे लागेल. पुस्तकाचे बाइंडिंग उत्कृष्ट असून पृष्ठ सुद्धा त्याच तोडीची आहेत. लेखकाची मेहनत भन्नाट आहे कारण भाषातंर करणे हे सोपे काम नाही कारण तळटीपा वाचताना ते उमजत जाते. विविध कालगणना, इंग्रजी दस्तावेज आणि फारसी कागद पडताळताना दमछाक नक्कीच झाली असेल पण कुठेही ते जाणवत नाही ह्यासाठी रोहिरावांना एक कडक सलाम!


No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960